सिबील स्कोर म्हणजे काय_तो कसा मिळवावा?

आता जर आपणास कोणतेही कर्ज/लोन घ्यायचं असेल तर एक शब्द तुमच्या कानावर नेहमी पडत असतो. तो म्हणजे श म्हणजे ‘सिबिल स्कोअर’ होय. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पर्यंत असतो. जेवढा जास्त स्कोअर तेवढी चांगली बाब. तुम्ही जर 900 सिबिल स्कोअर च्या जवळपास असाल, तर हा चांगला स्कोअर मानला जातो. जर तुमचा सिबिल स्कोअर 300 च्या आसपास असेल तर ही वाईट बाब आहे.
CIBIL Score सिबिल स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज देतात असं देखील आहे. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर हा अत्यंत चांगला असणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांचं सिबिल हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा इतर कारणामुळे खराब झालेलं असतं. अशा परिस्थितीत बँका लोन देण्यासाठी टाळाटाळ करतात.

तुम्ही कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा होते. आपला सिबिल स्कोअर कधी कधी कर्ज किंवा EMI आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसल्यास खराब होतो. तुमचा सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी हे रखडलेले सर्व व्यवहार पूर्ण करा.म्हणजे आपला सीबील स्कोर सुधारेल

जर आपला सिबिल स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच आपल्याला लोन/ कर्ज घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर तुमचा सिबिल स्कोअर काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सिबिल स्कोअर मोबाईलमध्ये कसा तपासायचा जाणून घेऊ या..

https://homeloans.sbi/getcibil या वेबसाईटवर जा.यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल.
ही माहिती व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला दिसून जाईल.तसेच याचे PDF सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करता येईल.हे PDF पासवर्ड प्रोटेक्टड असते त्याचा तुम्हाला पासवर्ड SMS द्वारे मिळून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *